प्रशासन चा डोळ्या देखत लाखोंच्या महसूल पाण्यात
गडचिरोली/जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटावर मोठ्याप्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून पावसाळ्या पुर्वी अनेक जण रेतीचे अवैध साठे करीत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील तहसील मधील मुडझा ,गुरवळा ,चांदाळा ,राणभुमी, तसेच आरमोरी तहसिल मधील डोंगरसावंगी लागून असलेल्या लहान नद्यातुन सर्रास पने अवैध उत्खनन सुरू आहे आला आहे. पावसाळ्यात नदी पात्रात पाणी असल्याने रेती उत्खनन करणे कठीण जाते. त्यामुळे अनेक जण रेतीचा साठा करीत आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाने रेतीसाठा करण्यावर निर्बंध घातले त्यानंतरही जिल्ह्यात ठिकठिकाणी रेतीची साठवणूक होत आहे.




