अहेरी प्रतिनिधी )-महाराष्ट्र-तेलंगणा या दोन राज्यांच्या मधोमध वाहणाऱ्या प्राणहिता नदीपात्रात घडली. तेजस राजू बोम्मावार असे तरुणाचे नाव असून तो अहेरीतील वांगेपल्ली गावचा रहिवासी आहे.सविस्तर वृत्त असे की, राजू बालय्या बोम्मावार यांचा अहेरीलगतच्या वांगेपल्ली येथे हार्डवेअरचं दुकान आहे. त्यांना दोन मुलं असून मोठा मुलगा पुणे येथे एमबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. दिवाळीनिमित्त दोन दिवसांपूर्वी तो आपल्या घरी सुट्ट्यांसाठी आला. शुक्रवारी तो लगतच्या प्राणहिता नदीपत्रात आपल्या काही मित्र आणि नातेवाईकांसोबत आंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरीकरांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. तर अहेरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार हे देखील आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि महसूल प्रशासनातर्फे बोटीच्या साहाय्याने जवळपास सकाळी ९.३० पासून शोधमोहीम राबविण्यात येत असून त्याचा पत्ता लागलेला नाही.
तेजस बोम्मावार हा पुणे येथे एमबीए अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. अंघोळीसाठी नदीपात्रात वाहून गेल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी बोम्मावार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, बाबा आणि लहान भाऊ आहे. अहेरी येथील तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतच्या बोटीद्वारे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.