spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraशहरातील गडचिरोली_̊ चंद्रपुर महामार्गांवरील अतिक्रमण हटावमोहीम सुरू.

शहरातील गडचिरोली_̊ चंद्रपुर महामार्गांवरील अतिक्रमण हटावमोहीम सुरू.

पोलिसांच्या मदतीने न.प.ची मोहीम सुरू.

मूल: —- शहरातून जाणाऱ्या गडचिरोली चंदपूर महामार्गावर
वाढलेली वाहतुकीची कोंडी व गंभीर अपघाताची शक्यता लक्षात घेत ” खबर महाराष्ट्राची न्युज” ने महामार्गावरील अतिक़मण देत आहेत अपघाताला निमंत्रण व काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातांच्या
घटना यावर बातमी पत्र प़काशित केले. अखेर शहरातील वाहतुक सुरक्षा
लक्षात घेत आज पोलिसांच्या उपस्थितीत न. प. प्रशासनाने शहरातून धावणाऱ्या रहदारीच्या मार्गवरील् अतिक्रमण हटविणे आज सुरु केले आहे.

वाढलेली वाहतुकीची कोंडी लक्षात घेता मुल शहरातुन सिमेंट चे दुपदरी महामार्ग निर्मिती करण्यांत आली.याचं महामार्गावर 4 दिवसापुर्वीच एका भिषण अपघातात एक वयोवृध्द इसम गंभीर जखमी झाला होता .तरी सुद्द्धा प्रशासन ला जाग आली नाही.या घटनांवर “खबर महाराष्ट्राची न्युज” ने व्यापक लिखाण करुन जनसुरक्षा प्रशासनासमोर ठेवली होती. यात महामार्गावरील लागुन मोठया व्यवसायिकांनी आपल्या दुकानातील हार्डवेयर चे भारी लोखंडी साहित्य (सळाखी) पूर्णता फुटफाटवर ठेवुन वाहतूकीला मोठा जिवघेणा अडथळा निर्माण करीत असल्याचे विदारक चित्र सद्या मुल शहरात बघावयास मिळत असल्याचे चित्र पुढे आणले होते. आज सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत फुटपाथ
वर पुढे आलेले अतिक्रमण हटविण्यात तर आले आहे मात्र मोठया हार्डवेेअर वाल्यांनी पुणंपणे गिळंकृत केलेले महामार्गावरील फुटपाथ हटविले व महामार्गाचे दुतर्फा कित्येक महिन्यापासून उभी असलेली नादुरुस्त वाहने हटवून कडक धोरण ठेवले तरच शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक सुरक्षा सांभाळली जाईल असे जाणकार बोलताना दिसतात.

अतिक्रमण स्वता हटवा अन्यथा कार्यवाही.
…मुख्याधिकारी पवार.

शहरातील महामार्गावर अतिक्रमण करणाऱ्याची गय केली जाणार नाही.
अतिक्रमण धारकांनी केलेले अतिक्रमण त्वरित स्वता हटवावे.
अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल मालमत्ता सुद्धा जप्त् करण्यात येईल असा इशारा न.प.मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलाआहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे