spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraजाफराबाद ग्रामपंचायतीने बनवले गावभरात कचराकुंड्या, पण कचराकुंड्यातील कचरा फेकणार कोण ?

जाफराबाद ग्रामपंचायतीने बनवले गावभरात कचराकुंड्या, पण कचराकुंड्यातील कचरा फेकणार कोण ?

स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

सिरोंचा (रवि बारसागांडी तालुका प्रतिनिधी ) : तालुक्यात असलेल्या जाफराबाद येथे स्वच्छ ग्राम बनविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाय केले जात असतानाच रस्त्यावर कचरा होऊ नये म्हणून गावभरात कचराकुंड्या बनविण्यात आल्या आहेत .यासाठी ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून बनविण्यात आले.
सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत आहेच शिवाय राजकीय पुढाऱ्यांनाचे ओळखले जाणारे गावही आहे.
जाफराबाद येथे कायम स्वच्छता राहावी म्हणून ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावभरात सिमेंटच्या कचरा कुंड्या बांधण्यात आल्या आहेत.
स्वतंत्र संकलनगावात केवळ कचराकुंड्या बांधून स्वच्छता राखणे हाच ग्रामपंचायतचा उद्देश नसून, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता यावा, तसेच भावी काळात कचरा प्रक्रियाही राबविता यावी म्हणून ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कचराकुंड्या बनविण्यात आल्या . यामुळे आपसूकच कचरा विलगीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे असे ग्रामपंचायत प्रशासनाचे होते.
गावात स्वच्छतेसाठी कचराकुंड्या बनविण्यात आल्या काही हरकत नाही पण त्या कचराकुंड्या पुर्णपणे भरून तेथील कचरा रस्त्यावर येत आहे तर या कचराकुंड्या कधी साफ करणार असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. काही सुज्ञ नागरिकांकडून ग्रामपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
या कचराकुंड्या पाहिजे त्याठिकाणी बांधण्यात आले नसुन जिथे आवश्यकता होती तिथं बांधकाम करायला पाहिजे पण ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या मनमर्जीने सदर कचराकुंड्या बांधले काही कचराकुंड्याचा उपयोग होतो तर काहिंचा उपयोगच नाही.
गावातील स्वच्छतेच्या दृष्टीने या कचराकुंड्या साफ करव्या असी मागणी ग्रामस्थांन कडून केली जात आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे