
अवैध खाजगी वाहतुक दार प्रवाशांचा जिवाशि खेळत असल्याचा विडियो शोशल मिडियवर वायरल झल्याचे दिसत आहे
गडचिरोली/ अहेरी जिल्ह्याच्या दुर्गम भागात एसटीच्या बसफेऱ्या कमी असल्याने अवैध प्रवासी वाहतूक जोमात सुरु आहे. अगोदरच जिल्ह्यात दळणवळणाची सुविधा अपुरी आहे. त्यातच आलाप्लल्लि ते चंद्रपुर हा मार्ग खराब असल्याने रापम बसफेऱ्याही कमी आहेत. याचा फायदा दुर्गम भागातील अवैध प्रवासी वाहनधारक घेत आहेत तसेच खाजगी वाहनाने वाहतूकीचा नियमाचे तिन तेरा वाजवुन प्रवाशांचा जिवाशि खेळल्या जात आहे .

तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत अवैध प्रवासी वाहनधारक प्रवाशांकडून तिकीटाचे अधिकचे पैसे घेत आहेत. बसफेऱ्या कमी असल्याने दुर्गम भागात दळणवळणाची कोणतीही सुविधा नाही. बस कमी व प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणा असल्याने अवैध प्रवासी वाहनधारकांचे फावत | आहे. जनावरांसारखे प्रवाशांना कोंबून वाहतूक सुरु | आहे. एखाद्या प्रवाशाने तिकीटाच्या अधिकच्या प्रशाबद्दल विचारणा केल्यास त्याला वाहनात बसविले जात नाही. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना अधिकचे पैसे देवून प्रवास करावा लागत आहे.




