spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtra२८ करोडची वाढीव पाणी पुरवठा योजना भसकली.

२८ करोडची वाढीव पाणी पुरवठा योजना भसकली.

काही खाण्यात, बाकी पाण्यात?

    रोखठोक.


महेश पानसे.

मूल शहराला पाणी पुरविणारी जुनी हरणघाट पाणी पुरवठा योजना
अपुरी ठरु लागल्याची बाब पालकमंत्री तथा श्रेत्राचे आमदार ना.सुधिरभाऊ मुंगटीवार यां च्या लक्षात येताच,आता मूल वासियांना २४×७ दिवस
पिण्याच्या पाळण्याचा पुरवठा व्हावा यासाठी न.प.रा ‘ सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत २८ कोटी रूपये वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले.मात्रं योजना पूर्ण झाल्यानंतर मूल नगरवासियांना २४×७ सोडा धड घंटा, दिडघंटा सुदधा शुद्ध पाणी मिळत नसल्याने शहरात जी बोंब सुर झाली आहे ती बघता महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे तांत्रिक देखरेखीत पूर्ण झालेली ही पाणी पुरवठा योजना भसकली व करोडो पाण्यात गेले काय? हा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. या संबंधाने अधिक महिती घेतली असता झालेले
काम अतांत्रिक, कामचलावू झाल्याची माहिती पुढे आली असून ‘काही खाण्यात बाकी पाण्यात’ असे म्हणायला जनतेला वाव आहे लक्ष्मी कॉन्स्ट्रुक्शन् कंपनी ला सदर वाढीव पाणीपुरवठा योजना बांधकामाची निविदा देण्यात आली होती व प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाकडे या संपुर्ण बांधकामाची तांत्रीक देखरेख होती.

 बांधकाम पूर्ण झाल्यानंतर  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कामपुर्न त्वाचे प्रमाणपत्र देताच न.प. प्रशासनास  बिल अदा करण्यापूर्वी कुठलीही सहनिशा,तपासणी,चाचणी

घेण्याची गरज न वाटावी यातही बरेच पाणी मुरले असावे अशी शंका यायला वाव आहे. न.प. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जनतेच्या या ज्वलंत
निकडीचे भान ठेवले असते तर कमितकमी पाणी पिण्याच्या पाण्याचा
सवाल मवाळ झाला असता असे जागरूक नागरीक बोलताना दिसतात.

       वाढीव पाणी पुरवठा योजना

झाली,२८ कोटी मुरले .मूल नगरवासियांना सकाळी एकदा घंटा, दिडघंटा पाणी मिळतो, नविन पाईपलाईनला तांत्रिकदृष्टया कमकुवत केल्याने पाणी दहा फुटावर चढत नाही.लिकेजेस भरपूर असल्याने
पाणी पिवळसर येत आहे,अनारोग्य वाढण्याच्या भितीने नागरीक आर.ओ.कडे धावू लागले आहेत.

संपूर्ण शहरात वाढीव पाणी पुरवठा योजनेला गालबोट लागले,जनता अधिकारी व पदाधिकारीऱ्यांचे नावे बोटे मोडत

असताना नुकतीच ठेकेदाराची अनामत/सुरक्षा ठेव परत करून
न.प.प्रशासनाने हदद ओलाडल्याची माहिती पुढे आली
आहे.

विरोधक गप्प का?


मूल न.प.अंतर्गत ७००० हजारावर
नळधारक आहेत. वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या नावाने बोंबा मारत आहेत. करोडे ” काही खाण्यात काही पाण्यात गेले”. २४*7 सोडा दिडघंटा
शुद्ध पाणी मिळत नाही.मात्रं एवढा ज्वलंत विषय पुढयात असताना कुठलाही राजकिय पक्ष अथवा नेते साध्या चौकशीची मागणी
करताना दिसत नाही हाही संशोधनाचा विषय आहे. तेव्हा न.प.सत्तेत भा.ज.पा.होती.ते पुढे येणार नाहीत मात्र इतर राजकिय पक्ष या गंभीर बाबीकडे कानडोळा का करीत आहेत. की ‘तेरी भी चुप मेरी भी चुप ‘असा प्रकार तर नाही ना? हाही सवाल उठत आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे