spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraमहिलांच्या हातातील कौशल्यनी व्यवसाय भरभराटीस :-अल्का आत्राम

महिलांच्या हातातील कौशल्यनी व्यवसाय भरभराटीस :-अल्का आत्राम

📡खबर महाराष्ट्राची न्युज

भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या वतीने जागतिक हातमाग दिन साजरा करण्यात आला. आदरणीय चित्रा ताई वाघ यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जागतिक हातमाग दिन सप्ताह राबविण्यात येत आहे.यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील हातमाग व्यवसाय पुढे नेण्यासाठी ज्या महिला हातांच्या कौशल्यनी व्यवसाय पुढे नेत आहेत अशा सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोंभुर्णा येथील कार्पेट मध्ये तसेच बांबू पासून सूप टोपल्या विनणाऱ्या महिला तसेच बांबू पासून बांबू आर्ट करणाऱ्या महिला तसेच माती पासून मूर्ती भांडी बनविणाऱ्या लोकांचा सन्मान भेट वस्तू देऊन करण्यात आला. यावेळी विविध व्यवसाय करणाऱ्या 50 महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, सुलभा पीपरे नगराध्यक्ष, वैशाली बोलमवार शहर अध्यक्ष, श्वेता वनकर, रजिया कुरेशी,माधुरी मोरे,आकाशी गेडाम,रोहिणी ढोले, उषा गोरंतवार, सुनीता म्यॅकलवार,वैशाली वासलवार उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे