ठेक्याची रक्कम कुणाला जाते?
भाग क्रमांक ७
मूल शहरातून धावणाऱ्या दुपदरी महामार्गांचे खाजगीकरण झाले व हा
पटटा खाजगी ट्रॅव्हल्स वाल्याना ऑफ द पेपर विकण्यात आला का? महिण्यात ठेका कोण जमा करतो? शाशनाला काय फायदा? असे अनेक
सवाल मूल शहरवासियांसमोर उपस्थित होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.परिस्थितीही हेच दाखवित आहे की मूल शहरातून धावणारा २ कि.मी. महामार्गांच्या पटटयावर वाटेल तिथे ट्रॅव्हल्स उभ्या करणे,वाटेल तिथे वाहनतळ बनविणे, वाटेल तिथून प्रवाशी भरणे, जिथून तिथून ट्रॅव्हल्स फिरविणे, रात्रभर गाड्या या महामार्गांवर ठेवणे हा प्रकार
आता मुल शहरात खूलेआम सुरू झालेला व यामुळेच हा शहरातील
दुपदरी मार्ग भाड्याने दिला काय?हा संतापजनक सवाल उपस्थित होत
असावा.
मूल शहरातील वाहतुकीची कोंडी,अपधाताचे वाढते “ब्लॅक स्पॉट”
तयार होणे, ग्रीन सिटी च्या मूळ हेतूलाच काळीमा फासल्या जात असल्याची ओरड कायम सुरू आहे.पोलीस प्रशासन ,आर.टी.ओ.सारेच
जनतेच्या मागणीला केराची टोपली का दाखवित आहेत? हा सवाल शंका
उत्पन्न करणारा दिसत असल्याचे चित्र आहे.
शहरातील वाहतुक शिस्त बिघडली तरी चालेल.भविष्यात मोठे अपघात घडलेलं तरी हरकत नाही मात्र महिण्याकाठी मिळणारा लाखोचा हुंडा सोडायचा नाही हे वाहतुक पोलीस व आर.टी.ओ.ने मारलेली
काळया दगडावरची रेघ आहे का?असा सवाल उपस्थित होत आहे.
मूल शहरातून धावणारा दुपदरी मार्ग ठेक्याने दिल्याची शाशन दरबारी तशी
नोंद दिसत नाही. मग हा ठेका ट्रॅव्हल्स वाल्याना”ऑफलाईन कुणी दिला ?
स्वता आर.टी.ओ. सचिव असलेल्या जिल्हा वाहतुक सुरक्षा समिती याचा
शोध घेईल की या समिती पदाधिकारी यांच्या मजींने हा ठेका दिला गेला आहे हे जाणून घेण्यासाठी शहरवासिय उत्सुक दिसत आहेत.




