spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtrå̊ ट्रॅव्हल्स ची यातायात अन सुरक्षीतवाहतुकीची वाताहत?

̊̊ ट्रॅव्हल्स ची यातायात अन सुरक्षीतवाहतुकीची वाताहत?

भाग….४

मुल ( तालुका प्रतिनिधी )

जिल्हयातील जनतेला सुरक्षीत प्रवास ,नियमानुसार वाहतुक व्यवस्था हवी आहे. जिवघेणी,बेकायदेशीर खाजगी प्रवाशी वाहतुक,मनस्ताप देणारी मुजोरी प्रवाशी यांच्या सहनशिलते पलिकडे चालली असल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था ट्रॅव्हल्सच्या बेकायदेशीर वाहनतळ व नियमबाहय यातायातीने कोलमडली जात असेल तर याला जबाबदार पोलिस यंत्रणा,आर.टी.ओ.च्या नावाने पाडवा तर साजरा होणारच आहे हे जनमत आहे.मूल शहरातील जनता खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांच्या विरोधात नाही.विरोध आहे तो नियमबाह्य, जिवघेण्या खाजगी प्रवाशी वाहतुकीला. मूल शहराला “ग्रीन सिटी” बनविण्यासाठी ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी गत अनेक सालापासून मेहनत घेतली आहे.शहरातून धावणाऱ्या तिन कि.मी.महामार्गाला दुपदरीकरण करून, सुशोभीत करुन अपघात शुन्य करण्याचा मानस या ट्रॅव्हल्स वाल्यांनी,वाहतुक पोलिसांनी व आर.टी.ओ.नी खोडून काढला आहे व हिच खरी मूल नगरवासी यांची वेदना आहे.

मूल शहरातून धावणाऱ्या अर्ध्याआधिक महामार्गांवर खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची जत्रा अनियंत्रीत करणयाऐवजी मांडवली घेऊन या
महामार्गावरील वाहतुकीची कोंडी अधिक वाढविण्याचे काम यंत्रनेने
केले हे सांगायला मूल नगरवासीअधीर झालेले दिसतात.

चिड आणणारी बाब ही आहे की अगदी वर्दळीच्या बसस्थानकाचे गेटवर ट्रॅव्हल्स वाल्यांची मुजोरी सुरूअसताना वाहतुक पोलीस तिकडे
टी पाईंटवर आनलाइन पावत्या फाडण्यासाठी कातावून असतात ही
ओरड गंभीर असल्याचे चित्रीत होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे