मूल (प्रतिनिधी) : मुलांला भेटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या राजु देवाजी मेश्राम रा. राजोली आणि सोमाजी लक्ष्मण शेंडे रा. राजोली यांच्या घरातुन मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरटयांनी चोरुन लंबास केल्याची घटना मूल तालुक्यात राजोली येथे शनिवारी रात्रौ 10 वाजता पासुन तर रविवारी 8.30 वाजता दरम्यान घडली. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती .
मूल तालुम्यातील मौजा राजोली येथील राजु देवाजी मेश्राम वय 50 वर्षे रा. कन्नमवार नगर राजोली यांच्या घरातील आलमारीमधुन 10 तोडे जुने वापरात असलेले चांदीचे चाळ आणि 8 ग्राम सोन्याची काळा मण्याची पोत अज्ञात आरोपीने चोरून नेले सदर मुद्देमालाची किंमत 25 हजार आहे. तर राजोली येथीलच सोमाजी लक्षमण शेंडे वय 32 वर्षे रा. कन्नमवार नगर राजोली यांच्या घरातील आलमारीच्या लॉकर मधील 42 हजार रुपये रोख आलमारीचे लॉकर तोडुन अज्ञात चोरटयांनी चोरून नेले होते , अज्ञात आरोपीविरुध्द मूल पोलीस स्टेशन येथे कलम 457, 380 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते
सदर गुन्ह्याचा तपास हा चंद्रपुर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा टीम ने तपास केला असता आरोपींना पकडण्यास चंद्रपुर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या शाखेला यश आले असून सदर आरोपी हे चंद्रपूर चे रहीवासी आहेत श्रीकांत उर्फ बूटया राजू चुणारकर वय 19 वर्षे व व्यंकटेश उर्फ व्यंकटा महेंद्र कोपेलवार वय 20 वर्षें रा. महाकाली कॉलनी आंनद नगर चंद्रपूर यांना अटक केलेली असून पोलिस अधिक्षक रवींद्रसिंघ परदेशी यांचा मार्गदर्शन खाली अतिरीक्त पोलीस अधिक्षक रीना जनबंधु पोलिस निरिक्षक महेश कोंडावार .नितिन साळवे.प्रकाश बल्कि. सुभाष गोहोकर. मिलिंद जाभुळे. सतीश बागमारे यांनी तपास केला असुन पुढिल तपास सुरु आहे




