spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraपुन्हा चक्रीवादळाचं सावट; राज्यातील 'या' भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा,

पुन्हा चक्रीवादळाचं सावट; राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा,

जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा अंदाज
देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच आता 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
.

पुणे, 17 जुलै : देशातील अनेक भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच आता 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 जुलैदरम्यान गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे