spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraसमृद्धी महामार्गावरची घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली स्लिपरकोच ट्रॅव्हल्स चा मुल नजिक भिषण...

समृद्धी महामार्गावरची घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली स्लिपरकोच ट्रॅव्हल्स चा मुल नजिक भिषण अपघात

मुल: संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या समृद्धी महामार्गांवरील विदर्भ ट्रॅव्हर्स चा अपघात ताजे अस्ताना असाच परत एक अपघात दिनांक 15 /7/23 चा मध्यरात्री 12 वाजता चा दरम्यान गडचिरोली चंद्रपुर महामार्गावर मूल नजीक एम. आइ. डी. सी. पाँईट जवळ घडला.

सविस्तर वृत्त असे की रायपूर वरुन हैदराबाद ला 40 ते 45 मजुर प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणारी स्लिपर कोच टायगर कंपनी ची ट्रॅव्हर्स चा चालकाचे ट्रॅव्हर्स वरुन नियंत्रण सुटल्याने तसेच ट्रॅव्हर्स भरधाव वेगाने असल्याने रस्त्याचा कडेला शेतात जाऊन पलटलि. जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास त्यांनी धाव घेतली तसेच मुल पोलिस स्टेशन ला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुल पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात जिवित हाणी झालेलि नसली तरी काही प्रवाशी जखमी आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे