पोंभुर्णा येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पुढाकारातून बांधकाम कामगार यांना किचन सेट वाटप दिनांक 3,4,5 मे 2025 ला क्रीडा संकुल पोंभुर्णा येथे आयोजित केला होता. बांधकाम कामगार ऑफिच्या वतीने जिल्याच्या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात येत होते त्यामुळे जिल्यातील गर्दी एकाच वेळी होत असल्यामुळे मारामारीपिण्यासाठी पाणी नाही लोक कित्येक तास रांगेत त्यात कित्येक चक्कर येणे अशा असंख्य समस्या लोकांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सांगितल्या आणि तालुका स्तरावर वाटप करावे अशी विनंती केली. त्यामुळे संवेदनशील मनाचा नेता सुधीर भाऊ यांना त्या समस्यची दखल घेत लगेच बांधकाम अधिकारी, पोलीस यंत्रणा आरोग्य यंत्रणा यांना सूचना करीत लोकांना तालुक्यातील ठिकाणीच किचन सेट वाटप करण्याच्या सूचना केली आणि लागेल ती मदत स्वत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील 3500 बांधकाम कामगार नोंदणी झाली होती त्यापैकी 2500 लोकांना पोंभुर्णा येथे किचन सेट वाटप करण्यात आले काहींनी जिल्यात घेतले. या किचन सेट वाटप कार्यक्रम मध्ये लोकांना बसण्याचीव्यवस्था, पाण्याची व्यवस्था बिस्केट अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी मदतीसाठी उभे होते अशी व्यवस्था सुधीर भाऊ यांच्या पुढाकारातून उभी झाली आणि लोकांना होणारा त्रास सुधीर भाऊंनी एका झटक्यात सोडवला जे लोक जिल्याच्या ठिकाणी जाऊन वापस आले त्यांनी आपबीती सांगताना सुधीर भाऊंचे धन्यवाद मानले की आमी भाग्यवान आहोत आमचे आमदार सुधीर भाऊ आहेत आमच्या अडचणी स्वतःच्या समजून तात्काळ उपाय करतात आणि इतकी सूंदर व्यवस्था त्यांनी केली म्हणून लोकांनी सुधीर भाऊंचे आभार मानले. यासाठी पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, बांधकाम कामगार विभाग, अल्का आत्राम, सुलभा पीपरे, अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, ईश्वर नैताम, हरीश ढवस, राजू मोरे,रवींद्र मारपल्लीवार, अजय मस्के,गुरूदास पीपरे,गंगाधर मडावी,वैशाली बोलमवार ज्योती बुरांडे, तुळशीराम रोहणकर,बंडू बुरांडे,रोशन ठेंगणे, नैलेश चिंचोलकर, रवींद्र गेडाम, महेश रणदिवे,राकेश गव्हारे,मोहन चलाख, राहुल पाल,जितू चुदरी,संजय कोडापे, दर्शन गोरंटवार, विकास दिवसे, पपीता पोलपोलवार, सुनीता मॕकलवार, उषारांनी वनकर, माया कोहळे, मंजुषा ठाकरे, हिना बिश्वास,अशोक मांडवगडे, अतुल चुदरी, अतुल कोसरे, शुभम मंडोगडे, शिवम ओदेलवार,गजानन मडावी,अंकुश नाहगमकर, राजु ठाकरे,सांम्यक आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.