मुल : कॉलेज मध्ये शिक्षण शिक्षण घेत असलेली मुलगी घरून निघुन गेल्याने मुलीचा शोध घेण्यासंदर्भात वडील जानकीराम भोयर रा.महाकाली कॉलरीप्रकाशनगर चंद्रपुर ता.जी. चंद्रपुर यांनी पो. स्टे. मुल येथे दि. १९ मार्च २०२५ रोजी तक्रार दिली असून त्यांची मुलगी साक्षी जानकीराम भोयर वय १८ वर्ष ०७ महीने ही तीची मोठी आई छायाबाई सुधाकर बोरुकुटे रा. कुणबी मोहल्ला वार्ड क्र. ४ मुल. ता. मुल जि. चंद्रपूर हीचे घरी राहत होती व मुल येथील कर्मविर महाविदयालय येथे शिक्षण घेत होती. ती दि. १९ मार्च २०२५ रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी साक्षी भोयर ही कॉलेज मध्ये जातेअसे सांगुन घरूनगेली व दुपारी११:३०च्यासुमारास कॉलेजची
सुटटी झाल्यानंतर मुलगी ही दुपारी १. ०० वाजे पर्यंत घरीपरत न आल्याने मुलीचे नातेवाहीकांकडे मुलगी साक्षी हीला तिचे नातेवाहीक, बस स्टॉप मुल, रेल्वे स्टेशन, मुलींच्या मैत्रीणीकडेविचारपुस करुन शोध घेतला असता ती मिळाली नाही.त्यामुळे मुलगी साक्षी भोयर ही मिसींग झाल्याबाबत पो. स्टे. मुल ला तक्रार करण्यात आली. हरविलेल्या मुलीचे वर्णन रंग-गोरा, चेहरा-गोल, बांधा सडपातळ, केस काळे उंची ०५ फुट, ०४ इंच, बांधा सहपाताळ, अंगात नीळया रंगाचा जिन्स पेन्ट, काळया रंगाचा टीप, पायात काळया रंगाची जुती, भाषा- मराठी, अशा वर्णनाच्या मुलीचा आपल्या पो.स्टे. हद्दीतशोध घेऊन मिळुन आल्यास पो.स्टे. मुल येथे कळविण्यात यावे असे तपास. अधिकारी (प्रमोद चौगुले) परी. पोलीस उपअधिक्षक मुल व प्रभारी अधिकारी यांनी कळविले आहे.




