spot_img
Saturday, December 13, 2025
HomeMaharashtraगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात परत एक मोठा लोहप्रकल्प

गडचिरोली जिल्ह्यात परत एक मोठा लोहप्रकल्प

गडचिरोली : उद्योगविहरीत गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक

नकाशावर आणणाऱ्या सुरजागड लोहखाणीवर आधारित लॉयड्स मेट्ल्सच्या कोनसरी लोहप्रकल्पानंतर, अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे दुसऱ्या लोहप्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सुरजागड इस्पात या नावाने असलेल्या या प्रकल्पाची पायाभरणी बुधवार, दि.17 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ना. धर्मरावबाबा आत्राम, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पाच हजार कोटींच्या या प्रकल्पातून जास्तीत जास्त रोजगार निर्मितीला चालना मिळावी यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली अडीचशे एकर जमीन या प्रकल्पासाठी दान दिल्याचे कळते. या प्रकल्पाची उभारणी दोन वर्षात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे अहेरी तालुक्यातील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत होणार आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे