spot_img
Tuesday, December 10, 2024
HomeCrimeDonald Trump Rally Firing: …अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता; जाणून घ्या...

Donald Trump Rally Firing: …अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता; जाणून घ्या काय घडलं?

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत (Election Rally) हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने झाडलेली गोळी (Bullet Fire on Donald Trump) ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. ही गोळी दोन सेमीने चुकली अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता. पेनसिल्व्हेनियातील बटलर या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प हे प्रचारसभेला संबोधित करत होते. या गोळीबाराचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला कसा झाला? (How Was the Attacker Attack on Trump?)

डोनाल्ड ट्रम्प हे भाषणासाठी उभे होते. त्यावेळी अचानक त्यांच्या कानाजवळून काहीतरी गेलं. त्यानंतर ते तातडीने खाली वाकले. सुरक्षारक्षकांनी व्यासपीठावर धाव घेतली. गर्दी जमलेली होतीच तिथेच आरडाओरडा सुरु झाला. सिक्रेट सर्व्हिस कमांडोंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचं कडं तयार केलं. ट्रम्प त्यानंतर उठून उभे राहिले आणि मूठ आवळत आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं. ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानाच्या खालच्या बाजूला रक्त दिसून येत होतं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना तातडीने खाली उतरवलं आणि कारमध्ये बसवून घटनास्थळापासून दूर नेलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचं निवदेन काय? (What Donald Trump Said?)

गोळीबाराच्या या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं निवेदन समोर आलं आहे. “मी युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो. त्यांनी गोळीबारानंतर तातडीने कारवाई केली. रॅलीत ज्या व्यक्तीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशात असं कृत्य घडू शकतं यावर माझा विश्वास बसत नाही. हल्लेखोराबाबत मला तूर्तास काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र उजव्या कानाला गोळी चाटून गेली. त्यानंतर काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं आणि मी खाली वाकलो त्यामुळे माझा जीव वाचला.” असं ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.सिक्रेट सर्व्हिसचंही निवेदन
सिक्रेट सर्व्हिसने या घटनेनंतर निवदेन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर एका उंच ठिकाणी होता. त्या ठिकाणाहून त्याने ट्रम्प यांच्यावर काही राऊंड फायर केले. त्या ठिकाणी असलेल्या या व्यक्तीला ठार करण्यात आलं आहे. दोनजण जखमी झाले आहेत. १३ जुलैच्या दिवशी संध्याकाळी ६.१५ वाजता बटलर या टिकाणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. एका संशयित शूटरने रॅली ठिकाणाच्या उंच स्थानावरुन स्टेजच्या दिशेने गोळ्या झाडल्या. शूटरला सिक्रेट सर्व्हिस एजंटने ठार केलं. डोनाल्ड ट्रम्प हे आता सुरक्षित आहेत. या घटनेचा पुढील तपास आम्ही करत आहोत. ‘

सिक्रेट सर्व्हिसचंही निवेदन

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे