spot_img
Saturday, December 13, 2025
HomeCrimeपोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात आला होता. हल्ला करून आरोपी पळून गेले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन बल्लारशा जि. चंद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभिर्य ओळखुन . पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु हे तात्काळ घटनास्थळी पोहचुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारशा पोलीस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जबलपूर राज्य मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवून अटक करण्यात आली असुन, सदर आरोपी हे जबलपूर येथिल कुख्यात गैंग स्टार असुन त्यांचे वर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच उर्वरित दोन आरोपर्पीना स्थानिक पोलीस स्टेशन बल्लारशा यांचे मार्फतीने अटक करण्यात आले असुन पुढील तपास बल्लारशा पोलीस स्टेशन करित आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे