प्रतिनिधी मुल,
नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकास कामाचा झंझावात व त्यांच्या उत्तम कार्यप्रणाली यावर विश्वास ठेवत मुल तालुक्यातील कांतापेठ येथील ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत सदस्य दीपक सातरे, काँग्रेस कार्यकर्ते निखिल बोमनवार, विनोद गावतुरे यासह अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सदर प्रवेश हा नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याच प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देत भाजपचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जीप अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हा महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे , नंदकिशोर रणदिवे, शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, सुनील आयलनवार तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते, सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याची प्रतिक्रिया प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.