spot_img
Saturday, July 19, 2025
HomeUncategorizedमंडळ अधिकारी सह पटवारी लटकला लाच लुचपत चा जाळ्यात

मंडळ अधिकारी सह पटवारी लटकला लाच लुचपत चा जाळ्यात

गडचिरोली :मनीष रक्षमवार ( मुख्य संपादक ): शेतजमीन फेरफार करुन सातबारावर नावे लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणी करुन ६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या मंडळाधिकारी व तलाठ्यास २ ऑगस्टला जेरबंद करण्यात आले.ही कारवाई महागाव (ता. अहेरी) येथे २ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता करण्यात आली.

खमनचेरु येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जवंजाळकर (३८) वर्ग ३ व व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) वर्ग ३ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. महागाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा फेरफार करुन सातबारावर तीन नावे लावायची होती . त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याने प्रत्येकी ३ हजार रुपयांप्रमाणे तीन नावे लावण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणी केली. तडजोडीनंतर ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचमागणी पडताळणी करुन २ ऑगस्टला सापळा लावला. जल्लेवार याने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले, त्यानंतर मंडळाधिकारी भूषण जवंजाळकर यालाही ताब्यात घेतले.

एसीबीचे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जौंजारकर, अंमलदार प्रवीण जुमनाके यांनी कारवाई केली.२४ तासांत दुसरी कारवाई
१ ऑगस्टला लाच मागणी केल्याप्रकरणीधानोरात बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे यास अटक करण्यात आली, त्यानंतर २ ऑगस्टला अहेरीत मंडळाधिकारी व तलाठ्यास लाच घेताना पकडले. २४ तासांत एसीबीने दोन कारवायांत तिघांना जेरबंद केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे