spot_img
Saturday, December 13, 2025
HomeMaharashtraगडचिरोलीपोलीस जवानाने तरुणीवर अत्याचार करुन केले ब्लॅकमेल

पोलीस जवानाने तरुणीवर अत्याचार करुन केले ब्लॅकमेल

गडचिरोली : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करत व्हिडीओ बनविला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत सव्वातीन लाखांची मागणी केली. एखाद्या सराईत गुन्हेगाराला शोभावा असा हा गुन्हा चक्क एका पोलिस शिपायाने केला आहे. विशेष म्हणजे तो विवाहित असताना आपण पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगून त्या शिपायाने त्या तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासनही दिले होते.

अखेर तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. पद्माकर भगवान भोजने (38 वर्ष) असे त्या शिपायाचे नाव आहे.सदर पोलिस शिपाई पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचे सांगून त्याने एका 27 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. एवढेच नाही तर तिचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याने तिला दीड लाखाचे दागिने आणि रोख सव्वातीन लाख रुपये देण्याची मागणी केली. या प्रकाराने भांबावलेल्या त्या तरुणीने अखेर गडचिरोली पोलिस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. त्यामुळे त्या शिपायावर बलात्कारासह ॲट्रॅासिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे