- पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा भटपार येथील नागरिकांनी स्वत:हून पोस्टे येथे कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश्य वस्तू, वायर, बॅटरी व सलाखी (Spikes) केले जमा
- नुकतीच पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी केली होती माओवाद्यांना गावबंदी गडचिरोली जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो.

आज दिनांक 20/06/2024 रोजी पोलीस स्टेशन धोडराज हद्दीतील मौजा भटपार गाव जंगल परिसरातील घोटपाडी पहाडी जवळ माओवाद्यांनी सुरक्षा रक्षक दलास नुकसान व घातपात करण्याच्या उद्देशाने खडा बनवून त्यात लावण्यात आलेल्या लोखंडी टोकदार सलाखी (Spikes) तसेच कुकर मध्ये ठेवलेले आयडी सदृश वस्तू, वायर व बॅटरी मौजा भटपार गावातील नागरिकांनी स्वतःहून पोलीस स्टेशन ला येऊन जमा केल्या व यासोबतच तेथील गावकयांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज प्रभारी अधिकारी यांचेकडे सुपुर्द केला. यापुर्वीही दिनांक 14/06/2024 रोजी पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता.




