spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraगडचिरोलीअर्चना 'लेडी किलर'ची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त !

अर्चना ‘लेडी किलर’ची गडचिरोलीतील कारकीर्दही वादग्रस्त !

भूमाफियाशी हितसंबंध चौकशी

गडचिरोली: जमीन एनएसाठी करण्यासाठी रेटकार्डजमिनीचा वापर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी म्हणजेच नॉन ॲग्रीकल्चरकरता (एनए)करायचा असेल तर नगररचना विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवान्यासाठी सहायक संचालक अर्चना पुट्टेवार हिचे दर ठरलेले होते, अशी माहिती प्लॉटिंग क्षेत्रातील सूत्रांनी दिली. फाईलवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय ती पुढे सरकतच नव्हती. दररोज नगररचना कार्यालयात याद्वारे मोठी ‘उलाढाल’ होत असे. हेकेखोर स्वभावाच्या अर्चना पुट्टेवारचे कार्यालयीन सहकाऱ्यांशीही फारसे पटत नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

पूररेषेतही एनए परवाने कसे ?

दरम्यान,गडचिरोली शहराजवळील नवेगाव, मुडझा, कोटगल या भागालगत वैनगंगा नदी आहे. हा परिसर पूररेषेत तसेच अल्लापल्ली अहेरी या काही भागात ही भूमाफियांना हाताशी धरुन एनए परवाने वाटण्याचा प्रताप अर्चना पुट्टेवार हिच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. भूमाफियांना तिने संरक्षण दिल्यानेच पूररेेषेतील प्लॉटिंगलाही सोन्याचा भाव आला, या धोकादायक परिसरात मोठे इमले उभे राहिले. तिच्या कार्यकाळात दिलेल्या एनए परवान्यांची चौकशी झाल्यास मोठे गैरव्यवहार उजेडात येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे