spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraगडचिरोलीगडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांनी सासऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक

गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांनी सासऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक

  • इतर दोघांनाही केली अटक

गडचिरोली, दि. 08: नागपूर येथील वडीलोपार्जित सुमारे 300 कोटींच्या संपत्तीच्या वादातून स्वतः च्या सासऱ्याची कट रचुन हत्या केल्या प्रकरणी गडचिरोली येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिच्यासह इतर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

नागपूर येथील शुभमनगर परिसरात राहणारे पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा 22 मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेल मृत्यू झाला होता. त्यांची सुमारे 300 कोटींची वडिलोपार्जित संपत्ती असुन त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सुन अर्चना पुट्टेवार व मुलगी आहे. दरम्यान पुरुषोत्तम पुट्टेवार पत्नी शकुंतलाचे ऑपरेशन झाल्याने ते दवाखान्यातून मुलीच्या घरी जात असतांना कारच्या धडकेत पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताबाबत पुरुषोत्तम यांच्या चुलत भावाला संशय आल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली व तपासाला वेग आला. तपासाअंती त्यांच्या घरातील कारचालक सार्थक बागडे यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने चौकशी केली असता सचिन धार्मीक व नीरज निमजे उर्फ नायटी यांना पोलीसांनी चौकशीअंती ताब्यात घेतले असता त्यांनी पुरुषोत्तम यांची हत्या केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या प्रकरणात आरापौंनी दिलेल्या बयाणानुसार पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सुन व डॉ. मनीष यांची पत्नी अर्चना पुट्टेवार यांनी चालकाला पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली. त्यामुळे पोलीसांनी अर्चना पुट्टेवार हिला अटक केली आहे.

मालमत्तेचा मोह नडला

अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हया गडचिरोली येथे नगररचन सहायक संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या सासन्याच्या वडिलोपार्जित सुमारे 300 कोटींची संपत्ती असल्याने अर्चना पोर्लेवार यांनी त्या मालमत्तेच्या मोहात सासन्याच्या हत्येचा कट रचुन सुपारी देवून हत्या केली. मात्र हाच संपत्तीचा मोह आता त्यांना नडला असुन सासन्याच्या हत्ये प्रकरणी अर्चना पार्लेवार यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान अर्चना पार्लेवार हया गेल्या तीन वर्षापासून गडचिरोली नगररचना विभागात नगररचना सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहे. तिच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचाही प्रभार आहे. आपल्या कार्यकाळात नगरक्षेत्रातील विकास आराखडा मंजूर करतांना मोठा घोळ केल्याची चर्चाही रंगू लागली आहे. तर गडचिरोली शहरालगत अवैधरित्या अकृषक केल्याच्या तक्रारी तर तिच्या अवैध संपत्ती बाबत चौकशी केल्यास मोठा घोळ बाहेर येण्याची शक्यता असुन तिच्या अटेकेने आता गडचिरोली शहरातील भूमाफियांमध्ये खळबळ उडाल्याचे बोलल्या जात असुन अर्चना पार्लेवार यांच्याकडून पदभार काढून इतरांकडे देण्यात यावे असेही बोलल्या जात

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे