spot_img
Saturday, December 13, 2025
HomeUncategorizedअनोळखी मृतक व्यक्तीची शोध पत्रिका

अनोळखी मृतक व्यक्तीची शोध पत्रिका

मुल पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा

मुल: (मनोज मुंगमोडे /जिल्हा प्रतिनिधी)-माहिती याप्रमाणे आहे की यातील फिर्यादी नामे तुळशिराम केशव बांगर वय ६२ वर्ष धंदा शेती रा. वार्ड क ८ मुल यांनी घटना ता वेळी व ठिकाणी आपले शेतातील धानाचे पिकास पाणि करण्यास नदीच्या काठावर मोटारपंपाजवळ गेले असता त्यांना खराब दुर्गंधी वास आल्याने त्यांनी नदीकाठावर पाहणी केली असता वरील नमुद वयोगटातील अनोळखी मृतक हा मौजा मरेगाव उमानदीचे पात्रात काठावर मृत कुजलेल्या स्थितीत मिळुन आला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो. हवा. अजय धांडे/११२० पोस्टे मुल यांनी प्राथमिक चौकशी करून मर्ग क ७९/२०२४ कलम १९४ बि.एन.एस.एस.प्रमाणे नोंद केला.

अनोळखी मृतकाचे वर्णन सदर मृतकचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असुन वय अंदाजे ४० वर्ष वयोगटातील असलेला पुरुष इसम, उंची ५.५ फुट, डोक्याचे केस काळे बारीक गळालेले, बांधा मजबुत, चेहरा कुजलेला गोल, अंगात निळ्‌या आकाशी रंगाची हाफ बायाची टि शर्ट कमरेत निळ्‌या आकाशी रंगाचा फुलपॅन्ट घातलेला

सदर मर्गमधील अनोळखी पुरूष आपले परिसरातुन लापत्ता असल्यास किंवा हरविले असल्यास त्याचे फोटो ओळखुन व आपआपले कार्यक्षेत्रात शोथ घेवुन माहीती प्राप्त होताच पो.स्टे. मुल येथे कळवावे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे