spot_img
Saturday, June 6, 2026
HomeUncategorizedबोनालु पुजा कार्यक्रमाला भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती

बोनालु पुजा कार्यक्रमाला भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती

ओडीगुडम येथे भाविकांची एकच गर्दी

अहेरी:तालुक्यातील ओडीगुडम येथील बोनालु कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थिती दर्शवित पूजाअर्चा केले.

प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या महीलम्मा देवी मंदिर परिसरात दरवर्षी बोनालु पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले जाते.यंदा देखील २८ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.२८ एप्रिल रोजी शाही गंगास्नान,२९ एप्रिल रोजी बोनालु उत्सव आणि ३० एप्रिल रोजी महाप्रसाद वितरण केले जाणार असल्याने या ठिकाणी परिसरातीलच नव्हेतर तेलंगाना राज्यातील भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

२९ एप्रिल रोजी सोमवारी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून महिलाम्मा देवी मंदिरात पूजाअर्चा करत बोनालु उत्सवात सहभागी झाले.याठिकाणी असलेल्या महीलम्मा मंदिरात आयोजित कार्यक्रमात दरवर्षीच भाविकांची मोठी गर्दी होते.दूरवरून आलेले भाविक तीन ते चार दिवस मुक्कामाने राहतात.त्यामुळे भाग्यश्री ताई आत्राम यांनी भविकांशी आस्थेने संवाद साधत व्यवस्थेची पाहणी देखील केले हे विशेष.

यावेळी मंदिर कमेटीचे सदस्य तसेच महेश बाकीवार, नागेश करमे, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार,विजय कोकिरवार,नागेश पुल्लीवार,राजन्ना पैडीवार, भुदाराम पानेमवार,किशोर भट्टीवार, मुत्ता देवरवार, अशोक पानेमवार, लचम्मा पानेमवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे