spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedपोलिसाच्या आत्महत्येने खळबळ – राजुरा ठाण्यात कार्यरत पोलीस

पोलिसाच्या आत्महत्येने खळबळ – राजुरा ठाण्यात कार्यरत पोलीस

खबर महाराष्ट्राची न्युज. राजुरा पोलीस ठाण्यात कार्यरत 40 वर्षीय पोलीस नाईक सुशील कुंभमवार ह्यांनी चंद्रपूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे दिनांक 3 मार्च 2023 रोजी सकाळच्या वेळी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली असुन घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली.

प्राप्त माहितीनुसार नुसार सुशील कुंभमवार हे आजाराने त्रस्त होते. त्यांना राजुरा येथुन चंद्रपूरला बदली हवी होती मात्र त्यांची बदली झाली नसल्याने त्यांना नैराश्य आले असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण काय हे अजुनही अनुत्तरीत असुन पुढील चौकशीत कारण समोर येईल. तूर्तास चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील चौकशी सुरू आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे