खबर महाराष्ट्राची न्युज/मनीष रक्षमवार ( मुख्य संपादक )


आम्हाला सिद्धी प्राप्त झालीये, पैशांचा पाऊस पाडून दाखवू असे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीला पोलिसांनी अनेकदा कारवाई करत अटक केले असल्याचे आपण ऐकलेच असेन. त्यात अनेक प्रकारांच्या जंगली जनावरांच्या अवशेसांचा वापरही या पैस्याच्या तांत्रीक झळतीत (कजली) वापरल्या जात असल्याचेही जानकारांकडुन बोलले जाते.

असाच शंसयीत पद्धतिचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त, जंगलव्याप्त व आदवासी बहुल असलेल्या पालांदुर/ जमी या गावात घडलेला आहे. दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 5.00 वाजता सुमारास देवरी तालुक्याच्या पालादुंर/जमी या गावात अनेक वर्षापासुन अवैध व चिल्लर दारु विकनार्या रवी बोडगेवार उर्फ अन्ना (वय-५०) या ईसमाच्या घरात पोलिस व वनविभाने संयुक्त कारवाई करत छापा टाकला.
त्या छाप्यात पोलिस व वनविभाच्या हाती वाघ, बिबट ,मांजर कुळातील वन्यप्राण्याचे दात, नख, अस्वलाचे नखे, रानडुक्कर सुळे, चितळाचे शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, जिवंत मोर, मोराचे पिस, रानगव्याचे शिंग, जाळे, सुकलेले हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, देशी दारु पेटी अंदाजे किंमत ८४,००० रुपये, रोख रक्कम- २१,४९,४४०/- सापडली.

आरोपीला अटक करत पोलिस व वनविभागातर्फे युद्धपातळीवर तपास सुरू केला. तपासात आनखी चार आरोपी वनविभागाच्या हाती लागले त्यात आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, मानिक दारसू ताराम, अशोक गोटे, हे चारही राहणार मंगेझरी ता. देवरी, जी. गोंदिया यानां अटक करण्यात आले. तर या पाचही आरोपीनां न्यायालयाने 2 मार्च पर्यंत वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.

जिल्ह्याभर ह्या प्रकरनाची चांगलीच चर्चा रंगत असली तरी त्या साधारनसा दारु विक्रेत्याकडे लाखो रुपयांची रोकड व जंगली जनावराचें अवषेस तांत्रीक कंजली चे की जंगली जनावरांच्या तस्करीचे हा प्रश्न संबधीत प्रशासनासह नागरीनां पडु लागला आहे.




