मनीष रक्षमवार /मुख्य संपादक
घरात लागलेल्या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
तालुक्यातील कन्हाळगाव येथे एका घरात शॉटसर्किटमुळे रविवारी सकाळी अकरा वाजता आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र रोख रक्कमेसह ४ लाखांचे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे.

गोपाल गाजुलवार तालुक्यातील कन्हाळगाव येथे राहतात. रविवारी सकाळी अकरा वाजता कुटुंबातील व्यक्ती बाहेरगावी गेले होते मात्र कुटुंब प्रमुखांची पत्नी गावातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य आणण्याकरिता गेल्या होत्या धान्य घरी घेऊन येताच अचानक आपल्या घराला आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा केल्यात व घराशेजारी असलेले नागरिक येऊन पाहताच संपूर्ण घराला आगीने वेळा घातलेला होता तेव्हा शेजारील

नागरिकांनी मोटार पंपाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केलात मात्र आग विजवेपर्यंत आग भयानक असल्याने घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले नागरिकांनी आग विझवली कोरपणा तालुक्यातच असलेल्या नारडा दालमिया सिमेंट कंपनीमध्ये दूरध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिलीअग्निशामक बोलावण्यात आली

तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले अग्निशामकणे उर्वरित आग विझवण्यात प्रयत्नशील राहिली मात्र आग वाढतच गेली. या आगीत कपाटात ठेवलेले रोख 30 हजार, दोन क्विंटल ज्वारी, एक क्विंटल गहू, तादुळ,टीव्ही फ्रिज यासह घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

याप्रकरणी आज तलाठी कमलवार , पोलीस पाटील गोवर्धन मडावी, उपसरपंच विनोद नवले, कोरपना पोलीस विभागांची टीम, विद्युत विभागांच्या टीम,यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गोपाल गाजूलवार यांनी तहसीलदार कोरपणा वाकलेकर यांच्याकडे केली आहे.




