spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedअहेरी तालुक्यातील आलापल्लीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार : दोघांना अटक

अहेरी तालुक्यातील आलापल्लीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार : दोघांना अटक

गडचिरोली, ता. १२ : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेलया एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी (ता. १०) रात्री घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. रोशन गोडसेलवार (२३) रा. आलापल्ली व निहाल कुंभारे (२४) रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली अशी आरोपींची नावे आहेत.

एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. त्यानंतर निहाल कुंभारे याने तिला एका खोलीवर नेले. त्यानंतर संध्याकाळी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांनी त्या मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला. रविवारी (ता. ११) पहाटे तिला आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावर घडलेला प्रसंग जोरजोराने ओरडून सांगितला. मात्र, काही नागरिकांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. एका पोलिसानेही तिला तुझीच बदनामी होईल अशी भीती दाखवून घरी परत जाण्यास सांगितले.

त्यानंतर ती एटापल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत एटापल्ली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. रविवारी रात्री उशिरा अहेरी पोलिसांनी आरोपी रोशन गोडसेलवार व निहाल कुंभारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली, अशी माहिती अहेरीचे पोलिस निरीक्षक श्री. मानभाव यांनी दिली. यातील प्रमुख आरोपी रोशन गोडसेलवार हा एका राजकीय पक्षप्रणित संघटनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे