spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedप्रा.महेश पानसे,डा. विठ्ठल बोरकुटे,सुबोधदादा " सेवाव़ती "ने सन्मानित.

प्रा.महेश पानसे,डा. विठ्ठल बोरकुटे,सुबोधदादा ” सेवाव़ती “ने सन्मानित.

नागभिड: —– नेवजाबाई हितकारिणी
विदयालयातर्फे घोषीत सेवाव़ती पुरस्कार मन्यवरांचे हस्ते नुकताच राष्ट्रसंत विचारमंचावर प्रदान करण्यात आला. सदर सन्मान विवीध क्षेत्रात
सेवाभावी,जनकल्याण व आदर्श कार्या करिता प्रदान करण्यात आला असून सदर सन्मान राज्य पत्रकार संघाचे विदभं अध्यक्ष प्रा.महेश पानसे,श्री गुरूदेव वस्तीगुहाचे अध्यक्ष तथा नागभिड तालुक्यातील सेवाभावी वैद्दविठठलराव बोरकुटे,आत्मानुसंधान अडयाळ टेकडी चे संचालक सुबोधदादा यांना माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शोभाताई फडणविस, शिक्षक आमदार सुधाकरराव अडवाले, ने.हि.शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी मैया यांचेहस्ते प्रदान करण्यात आला.

पत्रकारितेतील चाणक्य म्हणून परिचीत महेश पानसे हे गत २५ ,वर्षांपासुन् अविरतपणे आपल्यालेखनीच्या माध्यमातून विवीध सामाजीक विषयांवर काम करीत असून विदर्भातील् अनेक पत्रकारांचे मार्गदर्शक आहेत.

तर विठठल बोरकुटे हे गत ५० ,वर्षांपासून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यदुत् म्हणून काम करीतआहेत. वर राष्ट्रसंताचे विचारांनी प्रेरित होऊन वस्तीगुहाचे माध्यमातून शेकडो विदयार्थी यांना सुविधा पुरवीत
आहेत. सुबोधदादा चेकार्य राष्ट्रसंताची विचारधारा पुढे नेण्यात मोलाची भूमिका सांभाळतआहेत.

ने.हि.विदयालय माजी विदयार्थी व विद्यार्थिनी भव्य मेळाव्यात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे