spot_img
Sunday, April 19, 2026
HomeUncategorizedसंतोष रावत यांच्यावर अज्ञात इसमाने केला गोळीबार

संतोष रावत यांच्यावर अज्ञात इसमाने केला गोळीबार

मूल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज अज्ञात इस्मानी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली.
आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.
संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे
मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे