मूल – चंद्रपूर कडून गोंदिया कडे जाणाऱ्या दुपारी 3-३० वाजताच्या रेल्वे गाडी आली असताना फाटक पाडली जाते. रेल्वे फाटक कर्मचारी फाटक पडल्यानंतर ती फाटकाच्या आत घुसली असताना फाटकवाले तिला पाहत होते. तरी देखील तिला फाटकाच्या बाहेर हो असे हटकले असते तर त्या बाईला रेल्वेच्या आत उडी मारता आली नसती असा प्रश्न सी सी. टी. व्हीं. कॅमेरा मद्ये प्रकरण कैद झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
कदाचित त्या बाईला तेव्हाच हटकले असते तर, तिला उडी घेता आलीच नसती. तिचे प्राण वाचले असते. असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील वार्ड क्रमांक ४ येथील रहीवाशी नंदु कामडे यांची स्नुषा कुणाली नरेश कामडे (२६) हीने आज दुपारी ३-३० वा.चे सुमारास चंद्रपूर मार्गावरील रेल्वे फाटक समोर धावत्या रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या करून जीवन संपविल्याची घटना शहरात घडली. रेल्वे स्टेशन पासुन रेल्वे फाटक हाकेच्या अंतरावर असल्याने ज्या रेल्वे खाली कुनालीने आत्महत्या केली त्या गाडीची गती घटनेच्या वेळेस हळु असल्याने कुणाली हिने उडी मारताच तिचा पाय अर्धा कटला. अंगावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालय नेऊन प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचे निधन झाले. मृतक कुनाली हीचे पती नरेश धान खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे तर सासरे स्थानिक सिध्दी विनायक मंदिरा समोर चहा चे दुकान चालवुन कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवायचे. कुनाली हीला ८ वर्षाचा मुलगा व 10 महिन्याची मुलगी आहे. आत्महत्या चे कारण अद्याप अस्पष्ट असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत. कृणालीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.मात्र मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही. तरी प्रश्न उपस्थित होत आहेत हे नक्की.




