सर्वत्र फटाक्यांचा आवाज प्रदूषण असतांना पर्यावरण प्रेमी शिक्षिकेने रोपे लावून ..रोप भेट देऊन साजरी केली दिवाळी

संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीत रोपांचे रोपन व रोप वाटप करुन सुट्टीचा सदुपयोग केला..

पर्यावरण सखी म्हणून ज्यांची ओळख आहे अश्या नवभारत विद्यालयातील शिक्षिका..सौ.वर्षा भांडारकर मॅडमनी.. दिवाळीच्या सुट्टीत दिवाळी सणाची तयारी सोबतच रोज एक नवीन उपक्रम करून संपूर्ण सुट्टी घालवली…

👇👇👇 उपक्रम
1.दिवाळी निमित्त पर्यावरण पूरक संदेश
2.योग समुहात फटाके मुक्त दिवाळी चा संदेश व तुळस रोप वाटप.
3.बालकदिनानिमित्य लहान बालकांना खाऊ,पेन,रोप वाटप.
4.गरजुंना कपडे व रोप वाटप.
5.दिवाळीनिमित्य टाकाऊ प्लाॅस्टिकग्लास व बॅग मध्ये रोपांचे रोपन.
6.कुंडीत पाम च्या रोपांचे रोपन.
7.कार्तिक एकादशी निमित्त कुंडीत शुद्ध वातावरण ठेवणारे तुळस रोप,स्नेक प्लान्ट चे रोपन.
8.पर्यावरण कार्य करणाऱ्या सखींची भेट…त्यांचं कौतुक.
9.बारश्याच्या कार्यक्रमात तुळस रोप भेट देऊन शुभेच्छा
10.भाऊ व वहिनीला रोप भेट देऊन भाऊबीज साजरी.इ.उपक्रम करुन स्वच्छ पर्यावरणाची जाण ठेवा..

आरोग्य मय जीवन जगा..अशा पर्यावरण पूरक म्हणी.. द्वारे जणजागृती इ.कार्य सतत त्या निस्वार्थ पणे करुन दिवाळी हा आनंदाचा सण साजरा केला..






