मुल: आज दिनांक 21.11.2023 रोजी 4:00 वाजता अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंघल ( वाहतुक) मुंबई पोलीस अधिक्षक यशवंत सोळंके वाहतुक विभाग नागपुर यांचे आदेशाने स. पो. नि. रवींद्र खैरकर यांचे मार्गदर्शना खाली

पो उप नि उमाकांत गौरकार व पोलीस सह जागतीक स्मरण दिन सप्ताह निमीत्य राजोरी स्टील इंडस्ट्रीज M I D C मुल या कंपनी मध्ये मॅनेजर मनिष रक्षमवार यांचे उपस्थीत 50 ते 60 कामगार यांना वाहतुकीचे नियमा बाबत ची माहिती त्यांना देवून व त्यांचेशी चर्चा करून प्रबोधन घेण्यात आले. स्मरण दिना निमीत्य वृक्षा रोपन केले. सदर कार्यक्रमास 50 ते 60 कर्मचारी उपस्थित होते.त्यांना खालील प्रमाणे वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

१) अवजड वाहन नेहमी दुसऱ्या लेन मध्ये चालवावे.,गणवेश नीटनेटका असावा, पूर्ण वेळ झोप घेऊनच वाहन चालवावे,वाहनांची स्थिती काय आहे ही खात्री करूनच वाहन चालवावे.
२) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा
३) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.
४) ट्रिपल सिट प्रवास करु नये.
५) दारू पिवून वाहन चालवू नये.
६) मो.सायकल चालवितांना नेहमी हेल्मेटचा वापर करावा
७) वाहन चालवितांना नेहमी वेगमर्यादा चे पालन करावे.
८) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.
९) गावांमधील रस्त्याने महामार्गावर येते वेळेस व महामार्ग ओलांडत असताना वाहतूक बघून सुरक्षित पणे ओलांडणे.
१०)विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.
११) वाहन चालवतांना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
१२) चारचाकी वाहन चालवतांना चालक व सहप्रवासी यांनी सीटबेल्ट वापरावे.
१३) मोटर सायकल चालवितांना नेहमी सर्व्हिस रोड चा वापर करावा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसेल त्या ठिकाणी शोल्डर लेन चा वापर करावा.
१४) महामार्गावर वाहन चालवताना आपले वाहन धोकादायक परिस्थितीत कोणतेही ठिकाणी थांबवू नये.
१५) वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वासाद
वेगाचा अंदाज न आल्याने पाठीमागील वाहनाने समोरील वाहनास धडक देवून अपघात घडतात.
16) वाहतुकीचे नियम न पाळल्यास अपघात झाल्यावर कुंटुबांचे आर्थीक, मानसीक, शाररीक नुकसान होवुन वेळ वाया जातो असे लोकांना पटवुन सांगीतले अशा सुचना देण्यात आल्या .माहीतीस सविनय सादर.
उमाकांत गौरकार. पोलीस उप निरीक्षक म.पो केंद्र चंद्रपुर जि. चंद्रपुर




