spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtra"समस्या मूल शहराच्या" आगळावेगळा व्हाट्सअँप ग्रुप.

“समस्या मूल शहराच्या” आगळावेगळा व्हाट्सअँप ग्रुप.

  • अखेर रहदारीचा मार्ग बनला.

मूल: —

अलीकडे व्हाट्सअँप ग्रुप तयार करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
राजकिय, सामाजीक,शैक्षणिक वा इतर प्रकाराचे अनेक व्हाट्सअँप ग्रुप
संदेश पोहोचविणे,मनोरंजन करणे,प्रसिद्धी करणे याकरिता उपयोगी पडतात .मात्र मूल शहरात गत अनेक महिण्यापासून कार्यरत “समस्या मूल शहराच्या” या व्हाट्सअँप ग्रुप ने जे काम सुरु केले व त्यामुळे शहरातील अनेक समस्या मार्गी लागल्यात ते बघता या ग्रुप ऍडमिन चे कौतुक करावे तेवढे कमीच.

माजी न.प.पदाधिकारी मोती टहलियानी यांच्या कल्पकतेतून “समस्या मूल शहराच्या” हा व्हाट्सअँप ग्रुप तयार झाला.मूल शहरातील जागृत,जानकार,समाज भान असलेल्याना या ग्रुप मध्ये जोडण्यात
आले. जे आपापल्या वॉर्डातील नगरी समस्या इथे टाकतात. यावर ग्रुप मध्ये सकारात्मक चर्चा होते.व शेवटी मोती तहलियानी व त्यांची चमू संबधित विभागाकडे सततचा पाठपुरावा करतात.या पाठपुराव्यातून संबधित विभागाचे लक्ष केंद्रित केले जाते व आतापर्यंत यातून अनेक नगरी समस्या मार्गी लागल्या आहेत. अन्यथा वर्षानुवर्षं याकरीता लागले असते हे
निश्चित. या ग्रुप वर समस्यांशिवाय व त्यावरील चर्चेशिवाय इतर वायफळ
लिखाणास अजिबात वावं नाही हे विशेष.

नुकतीच वॉर्ड १२ या जुन्या वस्तीतील प्रलंबित मार्गाची मोठी समस्या या
ग्रुप च्या माध्यमातून मार्गी लागल्याने समस्या मूल शहराच्या” हा व्हाट्सअँप
ग्रुप शहरवासियांच्या आपुलकिचा झाला आहे.

वॉर्ड न. १२ म्हणजे जुनी वस्ती. या वस्तीतील मुख्यमार्गाला जोडणाऱ्या
रस्त्यावरील अतिक्रमण (४ मिटर) न.प.ने जेसीबी लावून काढले. नंतर कार्य या उद्धस्त मार्गाची अवदशा कायम राहून येथील नागरिकांना मोठा
त्रास सहन करावा लागला. हा विषय मूल शहराच्या” या ग्रुप वर
नागरिकांनी टाकला. मोतीभाऊ टहल जियानी यांनी पुढे
वारंवार न.प.कडे पाठपुरावा केला व अखेर न.प.ने मुरूम पसरवून,डागडूजी करुन समस्या मार्गी लागली व नागरिकांचा त्रास संपला.

या ग्रुप चे माध्यमातून आतापर्यंत लहान मोठे अनेक नागरी समस्या सुटल्या आहेत . अशा पद्धतीने जनहितार्थ व्हाट्सअँप ग्रुप चा उपयोग
कौतुकास्पद ठरला असून या माध्यमातून नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे मोती टहलियानी व ऍडमिन सुधीर नागोशे,चिंताडे यांचे आभार मानणे हे नागरिकांचे कर्तव्यही आहे. विशेष म्हणजे या ग्रुप मध्ये सर्व स्तरातील नागरिकांचा समावेश आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे