रामपूरी येथील आदीवासी भागात पर्यावरण सखी सौ.भांडारकर मॅडमने गरजवंतांना दिवाळी निमित्त चांगले कपडे व सोबतच आंब्यांची रोप वाटप केली…त्यांच्या ओसाडलेल्या झोपड्यांना हिरव्या झाडाचा आधार व्हावा..हाच एकमात्र उद्देश कारण मी जेव्हा शालेय कामाकरिता रामपुरी भागात गेले असता एक मुलगी अंगणात उन्हात चुलीवर भाजी,भात शिजवत होती…

तेव्हा मी तिला म्हणाली बाळा,इथे तू एक आंब्यांचे झाड लावं…तेव्हा तिने रोप नाही असे उत्तर दिले…मी रोप दिल्यावर तू लावशील काॽ…असे म्हणताच तिने आनंदाने होकार दिला…म्हणून आज दिवाळीनिमित्त ही आंब्याची रोप त्या गरजवंतांना देऊन मनाला खूप आनंद मिळाला.. तसेच ही हिरवी रोप तळपत्या उन्हाळ्यात त्यांच्या साठी कुलरचे काम करेल.याचाही मनाला खूप आनंद झाला… त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न. मनाला आनंद देऊन जातो…🙏💧🌱




