मुल: चंद्रपुर मुल महामार्गाला लागून असलेल्या कर्मवीर महाविद्यालयाचा पटांगणावर (स्टीटलाइट) पथदीवे नसल्याने सर्वत्र अंधार रहातो त्या अंधाराचा फायदा काही युवा मुला मुलींचे जोडपे व अश्लिल चाळे करणार्या मजनूंना होतो. भविष्यात या ठिकाणी अनूचित घटना घडायला काही वावगे नाही तसेच पहाटे मुल शहरातील मुले स्त्रिया व ईतर नागरीक याच पटांगणावर ( मोर्निंग वॉक )फ़िरायला येतात लाइट नसल्याने प्रत्त्येकाला मोबाईल टार्च चा वापर करावा लागतो तसेच हा परिसर निसर्गाच्या सन्निध्यात असल्याने जंगली श्वापद चा वावर असतो पटांगणावर अंधार असल्याने जंगली श्वापद येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या करीता या पटांगणावर पथदीवे (स्टीटलाइट) ची व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगरसेवक महेंद्र करकाडे यांनी केली होती




