spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraमुल नगर पालिकेचा वाली कोण?

मुल नगर पालिकेचा वाली कोण?

मुल शहरात अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची कारवाई कधी होणार?

तालुक्यात अनेक ठिकाणी सभा, नेते मंडळी, राजकारण्यांचे दौरे , वाढदिवस, सणाच्या शुभेच्छा असलेले अनेक फलक रस्त्यावर आणि चौकामध्ये लावलेले दिसून येत आहेत, त्यावर आता मुल नगर पालिकेने कारवाईचे धोरण हाती घेणे महत्त्वाचे आहे. पालिकेने अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची मोहीम सुरू करावी या मोहिमेंतर्गत १०० हून अधिक फलक व बॅनर जप्त करण्यात येऊ शकते .

मुल पालिकेची परवानगी न घेता शहरातील मुख्य चौक आणि मुख्य मार्गावर अवैधरित्या फलक आणि बॅनर लावले गेल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, अपघाताला सुद्द्धा आमंत्रण देता येत आहे नियम देखील सर्व धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. या विरोधात पालिकेने अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची मोहीमच हाती घेऊन कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली आहे

शहरातील विविध चौक आणि मुख्य मार्गालगत लागलेल्या होर्डींग विरोधात काढण्याची . कायम सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

यापूर्वी अनेकवेळा पालिका केवळ तीन ते चार दिवस ही मोहीम राबवून नंतर याकडे दुर्लक्ष करत असल्याचा अनुभव शहरवासीयांना आला आहे. त्यामुळे पालिकेला या माध्यमातून प्राप्त होणारा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत असल्याचे चित्र आहे. पालिकेची परवानगी न घेता अवैधपणे फलक व बॅनर लावणाऱ्यांविरोधात जप्त व फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे; पण, पालिकेकडूनच याची कडक अंमलबजावणी केली जात नाही, अर्थात यामागे कारणे देखील विविध आहेत.

वास्तविक नेत्यांचे वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमाचे होर्डिंग व बॅनर लावताना पालिकेची परवानगी व शुल्क भरणे गरजेचे आहे; पण, कुणीही या प्रक्रियेवर गांभीर्याने पाहत नसल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडित निघत आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे