कर्मचारी बाहेरगावी राहून नगर पालिकेचे काम बघतात
शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार असतो. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रंदिवस अपघात होत असून साखळी दरोडेखोर सक्रीय झाले आहेत. मात्र असे असतानाही पालिकेकडून पथदिवे दुरुस्त केले जात नाहीत.
उल्लेखनीय म्हणजे आदिवासी मुलांचे वसतीगृह रोडवरील पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असतो. याशिवाय वळण रस्त्यावरील काही खांबांवर पथदिवे बसवलेले आहेत, तेही बहुतांश वेळा बंदच राहतात. त्यामुळे संपूर्ण मार्गावर अंधार आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते. तसेच रोडसह अन्य ठिकाणी दिवाबत्तीची व्यवस्था नाही. लाखोंचा खर्च करूनही सायंकाळच्या सुमारास शहरातील अनेक रस्त्यांवर आणि परिसरात अंधार पसरतो, असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. पथदिव्यांच्या देखभालीवर पालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. असे असतानाही शहरातील सुमारे ६० टक्के पथदिवे बंदच आहेत.
संबधित विभागचा अधिकाऱ्याला अभियंता ला भ्रमणध्वनी द्वारे विचारणा केली असता आम्ही बाहेर गावी असतो सकाळी बघू असे उत्तर नागरिकांना मिळतात तसेच गणेशोत्सव चे दिवस जवळ आले असून सुद्द्धा गणेश मंडळांना ना हरकत प्रमाणपत्र करीता रोज फेर फटका मारून सुद्धा एनओसी मिळत नाहीत असे नागरीकांचे म्हणणे आहे




