राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे दिनांक 23/08 /2023 ला करियर अँड प्लेसमेंट सेल व मार्गीन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे तर्फे युवा सशक्तिकरण कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समीर देसाई , गुणाकार अनवेकर, श्रद्धा साळवी , उल्हास आलेवर मार्गदर्शक मार्गीन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे उपस्थित होते. माननीय समीर देसाई यांनी भारत हा युवकांचा देश असून युवकांचे सशक्तिकरण झाल्यास देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजच्या युवकांना रोजगार आणि उद्योगभिमुक बनवणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांच्यामध्ये कौशल्य क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. युवकांनीआपल्यातील क्षमता आणि गुणांना ओळखूनआपल्या करिअरची दिशा निश्चित करावी. याविषयी सविस्तर मार्गदर्शन तर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक खोब्रागडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रागिणी पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयसिंह पवार तर आभार प्रा.मुकेश निखाडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रामचंद्र वासेकर प्रा. प्रशांत वासाडे प्रा. देवीलाल वाताखेरे तसेच प्राध्यापक वृंदांनी परिश्रम घेतले.सदर कार्यशाळेला बहुसंख्या विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते.




