मूल:—-जिल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन,सास्कुतीक कार्य व मत्सपालन मंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा रोपटे देऊन राज्य पत्रकार संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
नुकताच मूल येथे ना.मुनगंटीवार मित्रमंडळ व तालुक्यातील अनेक सामाजीक,राजकिय,शैक्षणिक संघटनांतफै भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मूल चे अनेक पदाधिकारी अनुक़मे मनिष रक्षमवार,सतिष राजूरवार,धमैश सुत्रपवार,राजू सुत्रपवार यांनी यावेळी फणसाचे रोपटे व शाल देऊन पालकमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा सत्कार केला.सदर भेट वनमंत्री यांनी सोबत घेण्याची सुचना आपल्या सहायकांना केली.
या भव्य स्वागत समारंभात तालुक्यातून ४ ते ५ हजारावर नागरिकांची उपस्थिति होती.




