spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraगडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांनी सासऱ्याची हत्या करण्या साठि दिलि 1 कोटी...

गडचिरोलीच्या नगररचनाकार अर्चना पार्लेवार यांनी सासऱ्याची हत्या करण्या साठि दिलि 1 कोटी ची सुपारी

बालाजी नगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना चिरडण्यात आलं होतं. २२ मे रोजी झालेल्या या अपघात प्रकरणी सुनेसह तिघांना अटक करण्या

नागपूर: नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुनेनेच सासऱ्याच्या हत्येची १ कोटी रुपयांना सुपारी दिली होती अशी माहिती समोर आलीय. याशिवाय बारचे लायसन्स आणि बारसाठी जागा द्यायचंही आमिष दाखवलं होतं. बालाजी नगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना चिरडण्यात आलं होतं. २२ मे रोजी झालेल्या या अपघात प्रकरणी सुनेसह तिघांना अटक करण्यात आलीय याबाबत मिळालेली माहिती अशी की, बालाजीनगर परिसरात २२ मे रोजी झालेला अपघात हा घातपात असल्याचं समोर आलंय. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आलं होतं. यासाठी पुरुषोत्तम यांची सून अर्चना हिनेच तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. तपासात अपघात नसून त्यांना सुपारी देऊन चिरडण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव आल समोर आहे.सुनेने सासऱ्यांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. सासरे पुरुषोत्तम यांची ३०० कोटींची संपत्ती आहे. ती आपल्याला मिळावी यासाठी सून अर्चना हिने सुपारी दिली. त्यासाठी तिने १७ लाख रुपये एडव्हान्स रक्कम दिली होती. सून अर्चना ही गडचिरोलीत सरकारी नोकरी करते. आता या प्रकरणात आणखी कोणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे