विद्युत वेळी अवेळी खंडित, कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने सारेच त्रस्त
गडचिरोली: ना पाऊस ना वादळ तरी वारंवार वीज खंडीत पुरवठयाने नागरिक त्रस्त झाले असून शहराच्या गणेश कॉलनीतील संतप्त नागरीकांनी ३० मे रोजी गुरुवारला येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली, दरम्यान वीज पुरवठयाची समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली. मागण्यांचे निवेदन सहायक अभयंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नागरीकांनी म्हटले आहे की, गणेश कॉलनी वार्ड क्रमांक १६ येथे वास्तव्यास असून. मागील दोन ते तिन महिन्यांपासुन या क्षेत्रातील विज पुरवठा रात्री अपरात्री वारंवार खंडीत होत आहे. तसेच सांयकाळी दररोज कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने यापूर्वी गणेश कॉलनी वार्ड क्रमांक १६ येथे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. योग्य दाबाचा विज पुरवठा होण्यासाठीनविन डि.पी. व ट्रान्सफॉर्मर लावण्याबाबत विनंती केलेली होती. परंतु अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे येथील नागरीकांना मागील ०२ ते ०३ महिन्यापासुन नाहक मनस्ताप
सहन करावा लागत आहे.कमी दाबाचा विद्युत पुरवठयामुळे आजारी व्यक्ति तसेच लहान मुले, वृध्दांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम हात आहे. तसेच कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्यासुरु
विद्युत उपकरणेही खराब होत आहे. रात्री अपरात्री पाण्याची आवश्यकता भासल्यास पाण्याची मोटारही सुरु

होत नाही, अश्या अनेक तक्रारीमुळे येथील नागरीक त्रासले आहे. या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नविन डि.पी. व ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावे. अन्यथा कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने काही अनुचीत घटना घडल्यास यास महावितरण जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून दिला.
एकाच डीपीवर वीज पुरवठ्याचा येतोय का भार ?
सद्यस्थितीत उन्हाळा सुरु आहे, तसेच हवामानात उकाडा असल्याने, नागरीकांना फॅन तसेच कुलरची अत्यंत आवश्यकता राहते, परंतु विज पुरवठा वारंवार खंडीत होणे, तसेच दररोज सांयकाळी न चुकता या क्षेत्रातील विजेचा दाब अतिशय कमी होणे, त्यामुळे गडचिरोली शहरातील पुर्ण विजेचा लोड या एकच डि.पी. वर येतो की काय ? अशी शंका आता येथील नागरीकांना येत आहे.




