आज दिनांक 28 मे रोजी ने.ही. विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मुलांची शाळा येथे इयत्ता दहावी व ब बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. काल 27 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल राज्यात सर्वत्र जाहीर झाला त्यामध्ये नेवजाबाई हितकारणी विद्यालय मुलांची शाळा येथील मुलांनी बाजी मारली. विशाल जनबंधू या विद्यार्थ्याने 94 टक्के मिळवून शाळेत प्रथम आला तसेच दिनेश निकोडे , व लोकेश दुपट या विद्यार्थ्यानी 93 टक्के मिळवून शाळेतून द्वितीय आले. यश बन 90.80% ओझर जोडे 91.80% अजय बुगावार 91.60% मिळवून विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारली. तसेच काही दिवसांपूर्वीच इयत्ता बारावीचा निकाल सुद्धा लागला आणि त्यामध्ये गौरव बरलावार या विद्यार्थ्याने कला शाखेत 86.50 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मानकरी ठरला. तसेच विद्यार्थिनी अंशू देशमुख हिने ८१.१७% मिळवून शाळेतून दुसरी आली.

वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेमध्ये संपन्न करण्यात आला त्यामध्ये ने.ही. संस्थेचे सचिव श्री माननीय अशोकजी भैया उपस्थित होते. संस्थेचे सदस्य श्री ॲड. उराडे साहेब उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक जी एन रणदिवे सर शाळेचे पर्यवेक्षक नाकाडे सर उपस्थित होते तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी त्यांचे पालक व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका वृंद उपस्थित होते. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी शाळेतील शिस्त व शाळेतील शिक्षक आणि संस्थेचे सचिव यांच्या कार्य प्रणालीला व मेहनतीला स्वतःच्या यशाचे गमक मानले.वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माया कापगते यांनी केलं. व आभार खाडिलकर मॅडम यांनी मानले.




