spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraगडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांचा , शिर्डी येथे दर्शन करून परत येत असताना अपघात...

गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांचा , शिर्डी येथे दर्शन करून परत येत असताना अपघात घडला आहे.

ड्रायव्हरची डुलकी प्रवाशांच्या जीवावर बेतली; शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे, स्कॉर्पिओचा अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे

खामगाव तालुक्याच्या आंबेटाकळी – बोरी आडगाव रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. अपघात नेमका कसा घडला याबाबत अजून माहिती स्पष्ट नाही. मात्र चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे शिर्डी, शेगाव येथून देवदर्शन करून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची घटना २६ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी ते बोरी अडगाव रस्त्यावर झाला असून यात देवराव रावजी भंडारकर (वय ५५) हे जागीच ठार झाले, तर ६ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

हे सर्व प्रवासी गडचिरोली जिल्ह्यातील असून, शिर्डी येथे दर्शन करून परत जात असताना हा अपघात घडला आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे