मुल : तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. किराणा सामानाचे विक्री करणार्या दुकानातून खुलेआम सुरु असलेल्या या काळ्या बाजाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या १ हजार एकशे दोन या सरकारी दराप्रमाणे मिळणारे घरगुती सिलेंडर १ हजार ४०० ते १ हजार ५०० रुपयांना विकले जात आहेत.घरगुती सिलिंडर घेण्याकरिता गॅस कंपन्यांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय ग्राहकांना एजन्सीकडून सिलिंडर दिला जात नाही. तशा स्पष्ट सूचना देखील एजन्सीच्या बाहेर लावलेल्या आहेत. मात्र या सूचना फक्त घरगुती गॅस धारकांसाठीच असल्याचे चित्र सध्या परिसरातील दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे. परिसरातील गावांमध्ये असलेली भांड्यांची दुकाने किराणा मालाच्या दुकानाबाहेर बिनदिक्कत विकल्या जात असलेल्या या गॅस सिलेंडर मुळे गॅस वितरण एंजन्सी च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपास्थित करण्यात येत आहेत. त्याच सोबत परिसरातील हॉटेल, चायनीज सेंटर, स्वीट होमच्या दुकानात देखील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याचा प्रकार घडत आहे. घरगुती गॅसधारकांना दुय्यम वागणूक आणि काळ्या बाजाराने सिलिंडर घेणार्यांना विनाबुकिंग तत्पर सेवा गॅस एजन्सी देत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून होत होत्या; मात्र पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सिलेंडर साठी क्रमांक लाउन सुद्द्धा घरपोच सिलेंडर मिळत नाही संबधित एजंन्सि धारक सोबत बोलले असता उडवा उडविचे उत्तर देतात. संबधित प्रशासन ने या गंभिर बाबी कडे ल़क्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे




