कर्नाटक (हुबळी) येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील राकेश ठाकूरची विदर्भ दिव्यांग क्रिकेट असोसिएशन संघातून आणि मध्य विभागीय संघात निवड झाली. यावेळी भाजप जिल्हा सचिव चंद्रपूर महानगर, चंद्रपूर तथा अध्यक्ष समृद्ध युवा बहु संस्था राजेशअण्णा येलय्या कोमल्ला ने त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. राजेश अण्णा म्हणाले की, एक दिवस असा येईल जेव्हा राकेश ठाकूर अनेक लोकांसाठी प्रेरणास्रोत बनतील. दिवसाचे 12 तास काम करून आणि दिव्यांग असूनही, दर रविवारी क्रिकेटचा सराव करून तो हा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला. या सामन्यानंतर काही खेळाडूंची निवड भारतीय संघात करन्यात येहिल. आपल्या सर्वांकडून राकेश ठाकुरचे अभिनंदन. या प्रसंगी राजेन्द्र दुर्गे, कैलाश भीमनवार, तेजा सिंग, आनंद यादव, प्रवीन मुडारप, सविता तिरुपति चिल्केवार, सविता परसनात, आशीष मेश्राम, सरगम भीमनवर, विक्की डहेरिया, शोभा वाघमारे, वृंदा जांबुडकर, प्रतीक सोंदिया आदि उपस्थित होते.




