आरडा ओरडा केल्याने हिसकावले ला मोबाईल फेकुन व बॅग घेऊन पसार
मुल : रेल्वेस्थानक वरुण घरी जात असलेल्या इसमावर दि. 13 मार्च 2024 रोजी रात्रीच्या 10 वाजता चा दरम्यान मुल रेल्वेस्थानक रस्त्यावर अडवून त्यांची लूटमार करत त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना मुल रेल्वेस्थानक रोडवरील परिसरात घडली आहे.
देवेन्द्र राऊत , (वय 45 वर्षे), हे मुल येथे वार्ड क्रमांक 15 येथे राहत असून ग्रेटा पॉवर कंपनीत नोकरी करतात. दि. 14 मार्च 2024 रोजी रात्री 10 वाजे दरम्यान देवेंद्र राउत हे आपल्या स्वगावी वडसा येथून रेल्वे नी परत येत होते काही अंतरावर पैदल येत असतांना 2 अनोळखी ईसम पाठलाग करीत त्याचा पाठी मागे येत होते तसेच सुनसाण भाग येताच देवेंद्र यांचा खिशातील मोबईल हिस्कावुण त्या 2 इसमा नी पळ काढला देवेन्द्र राउत हेच तसेच बॅग जागेवर ठेवुन त्यांचा मागे आरडा ओरड करीत पाठलाग केला तर त्यांनी मोबाईल फेकुन बॅग घेऊन पळ काढला तसेच देवेंद्र यांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशन गाठुन तक्रार दिली रेल्वेस्थानक परीसरात अशा नसेडी मुलांचे टोळके दिसून येतात अशा लोकांवर योग्य कारवाई करावी अशी मुल चा जनतेची मागणी आहे




