मिळालेल्या संधीचा फायदा घेत ब्लॅक मनीवर व्याज कमावून अल्पावधी बनला कोट्याधिश
देसाईगंज-
आदिवासीबहुल अतिदुर्गम,अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्याला लाभलेल्या तीन अभिशापामुळे कित्येक शासकीय अधिकाऱ्यांना विकास साधण्याच्या नावाखाली पाठविण्यात येते.मुळात यापैकी बऱ्याच अधिकाऱ्यांचा जुना रेकॉर्ड तपासण्यात आला असता गडचिरोली जिल्ह्यात बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी बहुतांशी अधिकारी हे कुठल्या ना कुठल्या प्रकरणात एकतर वादग्रस्त ठरल्याचे आढळून येतात किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असल्याचे आढळून येतात.यापैकी असणारांचा रेकॉर्ड खंगारुन आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून सक्रिय असलेला देसाईगंज येथील तांदुळ माफिया जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कोट्यावधी रुपये हवालाच्या माध्यमातून सफेद करवून देण्यात मौलिक भुमिका बजावीत असल्यानेच अनेक भ्रष्ट अधिकारी त्याच्या संपर्कात येत असल्याचाच फायदा घेत ब्लॅक मनीवर व्याज कमावून अल्पावधीत कोट्याधिश बनलेला तो दलाल कोण?या चर्चेला आता शहरात चांगलेच उधाण येऊ लागले आहे.
आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची औद्योगिक नगरी म्हणून देसाईगंज शहराकडे पाहिल्या जाते.या शहरात विशेषता राईसमिल सोडुन कुठलेही मोठे उद्योग नसुन सुरु असलेला ए.ए.एनर्जी प्लँट देखील अखेरच्या घटका मोजत आहे.तब्बल साडे तीन हजार लोकांना प्रत्यक्ष तर किमान १५ हजार लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार देणाऱ्या पोरवाल पल्प अँड पेपरमिलने गलिच्छ राजकारणाच्या षडयंञाला बळी पडून केव्हाचीच नांगी टाकली आहे.अशात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योग म्हणून राईसमिल या औद्योगिक क्षेञाकडे पाहिले जात आहे. वस्तुता या धंद्याच्या आड मागील काही वर्षांपासून अनेक गोरखधंदे सुरु असुन जिल्ह्यातील संबंधित अभिकर्ता संस्थेकडून भरडाईसाठी देण्यात आलेल्या धानाच्या बदल्यात तोच तांदुळ शासकीय गोदामात जमा करणे अनिवार्य असताना या प्रकरणात वारंवार दोषी आढळून आलेल्या एका तथाकथित प्रतिष्ठित राईसमिलर्सला वेळोवेळी अभय देण्यामागचे कारण आता चव्हाट्यावर येऊ लागले असुन जिल्ह्यात सुरु असलेल्या सिएमआर मिलींग घोटाळ्याचे प्रकरण भ्रष्ट अधिकाऱ्यांशी असलेल्या मधुर संबंधाशी जोडल्या जाऊ लागल्याने उशिरा का होईना बिंग फुटण्याची शक्यता आता वर्तवण्यात येऊ लागली आहे.
देसाईगंज शहरात गेली कित्येक वर्षांपासून सिएमआर मिलींग करणारे राईसमिलर्स कार्यरत आहेत.यापैकी काही राईसमिलर्स मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा करीत असल्याचा ठपका ठेवून संबंधित राईसमिलर्सना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे.मात्र काही राईसमिलर्सनी शासनाच्या आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशन कडुन भरडाई करीता धानाची उचल करून प्रती लाॅट ९ लाख ८० हजार रुपये बँक गॅरन्टी शासना जमा करणे अनिवार्य असताना टिडीआर व बँक गॅरन्टीत हेराफेरी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे कोट्यावधी रुपये हवालाच्या माध्यमातून सफेद करण्यात मौलिक भुमिका बजावल्यानेच चक्क शासन परिपञकाला हरताळ फासुन प्रसंगी शासनाची दिशाभूल करून संबंधित तांदुळ माफिया राईसमिलर्सला लाभ पोहचवण्यासाठी अनेकांनी आपली प्रतिष्ठा देखील पणाला लावली असल्याचे एकंदरीत सुरु असलेल्या कारवाई वरून स्पष्ट दिसून येत असल्याचे सांगीतले जात आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित तांदुळ माफियाचे लगतच्या छत्तीसगड,तेलंगणा,मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व बिहार राज्यातुन रिसायकलिंग राशनचा निकृष्ठ दर्जाचा दोन ते तीन वर्षे जुना असलेला व अत्यल्प दरात सहज उपलब्ध होत असलेल्या तांदुळ पुरवठादारांशी साटेलोटे असुन त्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात तांदुळ पुरवठा केल्या जात असल्याचे सांगीतले जात आहे.यामुळे जिल्ह्यातील अभिकर्ता संस्थेकडून उचल केलेल्या धानाची भरडाई करून शासनाला तांदुळ पुरवठा करणाऱ्या राईसमिलर्सनी किमान प्रती क्विंटल ०.८० युनिट वीज जाळली किंवा नाही?देण्यात आलेल्या धानाची भरडाई करून तोच तांदुळ जमा करण्यात येतो किंवा नाही?याबाबत कुठलिही शहानिशा न करता तसेच राईसमिल ते बेसगोदाम वाहतूक भाड्यात प्रचंड गैरव्यवहार करून आर्थिक देवाणघेवाणीतुन काही अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपये कमावल्याचे सांगीतले जात आहे.मिळवलेला पैसा पांढरा करण्यासाठी हवालाच्या माध्यमातून का होईना मार्गी लावण्यासाठी हवा असलेला दलाल अनवधानाने राईसमिलर्सच सापडल्याची संधी हेरून जबाबदार अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने मिळवलेले कोट्यावधी रुपये पांढरे करून वर्तमान स्थितीत सुरु असलेल्या सिएमआर मिलींग घोटाळ्यात चक्क दोषी आढळूनही वाचविचाच प्रयत्न केल्या जात असल्याने व याआधीही देसाईगंज येथील सदर राईसमिलर्सने कित्येक जबाबदार अधिकाऱ्यांचे कोट्यावधी रुपये हवालाच्या माध्यमातून सफेद करून दिले असल्याचे सांगीतले जात आहे.त्यामुळे अल्पवयात कोट्याधिश झालेल्या त्या राईसमिलर्सच्या संपत्तीची सखोल चौकशी केल्यास अनेक घबाड उघडकिस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.माञ या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येणार काय?असा प्रश्न आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे.




