spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraअखेर सा.बा.विभागाला (महामार्ग) जाग आली.

अखेर सा.बा.विभागाला (महामार्ग) जाग आली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातील पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश

मुल:— चंद्रपुर महामार्गावर जानाळा गावासमोरील आगडी गावा लगत महामार्गावर जागो जागी खड्डे पडले. आहे त्या खड्यात पडून वा खडडे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकी चालकाचे नियंत्रण गेल्याने अपघात झाले. आतापर्यंत कित्येक लोकांचे प्राण गेलेत.

मोठी ओरड झाली.पाठपुरावा करण्यात आला पण काही उपयोग झाला नाही. हि बाब महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातील पदाधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी मुल एम. आइ. डी. सी. येथील राजुरी स्टिल कंपनी शी संपर्क साधुन काही मटेरीयल त्या रस्त्यावरील खड्यात टाकून आपले सामाजीक कर्तव्य निभवले. परंतू काही दिवसाने पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली व रस्त्यावर खड्डे पडुन अपघाताची मालिका सुरु झाली. दिवाळी मध्ये
दोन जणांचा पुन्हा बळी गेला. परत अजुन एकदा राज्यभरात पत्रकार संघाचे सदस्यांनी खड्डे भुजविले व सा.बा.विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला.अखेर या विभागाने 20/11/23 ला महामार्गावरील खड्डे डांबर टाकून भुजविलेत. हिच गोष्ट सा.बा.विभागाने आधी गंभीरतेने घेतली असती तर कदाचीत अनेक जणांचे प्राण वाचले असते हे मात्र खरे. जीव गेल्यानंतरच सा.बा.विभागाला जाग आली काय?सदर विभागाची कामे इतकी निकृष्ट दर्जाची असतात काय? हे सवाल मात्र
कायम आहेत. अशा पद्धतीने जीव गेले पण नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष देतील अशी सर्वांची अपेक्षा आहे.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे